माझी आई नगरसेविका स्व.सौ.अलकाताई यादव हिला समाज सेवेची खूप आवड होती. समाजसेवेचे बाळकडू मला तिच्यापासूनच मिळाले. म्हणतात ना की माणूस ज्या वातावरणात राहतो, मोठा होतो तसेच संस्कार त्याच्यावरती होत असतात, अगदी तसेच माझ्या बाबतीतही घडत गेले. समाजसेवा करण्याची आवड असेलेली माझी आई तिला पाहतच मी लहानाचा मोठा झालो व आपोआप माझ्यात समाजसेवेची आवड निर्माण झाली.
विविध प्रश्न, समस्या, दुःखी चेहरे घेऊन नागरिक माझ्या घराकडे येत असत आणि प्रत्येक प्रश्नाचे, समस्यांचे उत्तर आई कशी देते, लोकांच्या समस्या कशी सोडवते हे मी पाहत असत. नागरिक दुःख घेऊन आईकडे येत असत व जाताना थोडे का होईना पण समाधानी होऊन परत जात. असे कितीतरी अनुभव मी अनुभवले आहेत. हेच लोकसेवेचे बाळकडू मी लहान पणापासून अनुभवत आलेलो आहे. त्यामुळे मीही आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत आईचा जनसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. जशी माझी आई चिखली गावासाठी खंबीरपणे उभी होती अगदी तसेच मीही चिखलीगावाच्या विकासासाठी सदैव खंबीरपणे उभा असेल.
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार समारंभ
सफाई कामगारांना केलेले रेनकोट वाटप
सर्व धर्मीय मोफत विवाह सोहळे
पुरग्रस्थांसाठी केलेली मदत
धार्मिक सहल
Email: helpline@jitubhauyadav.com
Phone: +91 99606 86861